Ad will apear here
Next
प्रलंबित योजना मंजूर करण्याचे पंकजा मुंडे यांचे आदेश
प्रलंबित योजना मंजूर करण्याचे  पंकजा मुंडे यांचे आदेश.
मुंबई : ग्रामविकास आणि महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच वित्त व नियोजन विभागाची प्रलंबित विषयांवर बैठक घेतली. या वेळी वित्त व नियोजन विभागाकडे प्रलंबित असलेल्या माझी कन्या भाग्यश्री, स्मार्ट अंगणवाडी, सुधारित मनोधैर्य योजना आदी योजना, तसेच ग्रामविकास विभागाच्या विविध योजना तात्काळ मंजूर करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले. अंगणवाडी सेविकांचे मानधन वेळेत व नियमित मिळण्यासाठी, तसेच बँक खात्यात थेट जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक जुलैपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट बँकेत जमा होणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची घोषणा केली आहे. मातृत्व अनुदान योजनेत, ज्या गर्भवती महिला कोणत्याही कारणांमुळे आपली प्रसूतिपूर्व तपासणी करू शकलेल्या नाहीत त्यांना अशा प्रकारच्या तपासण्या करण्याच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देणे, कुपोषणग्रस्त महिलांच्या बाबतीत त्यांच्या आजारांचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देणे, किशोरवयीन व लवकर गर्भधारणा होणाऱ्या मुलींच्या बाबतीत त्यांना विशेष देखभालीची आवश्यकता असल्याने त्यांच्या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष देणे, गर्भधारणेच्या कालावधीत गर्भावस्थेमुळे उद्भवणारा रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा (ॲनिमिया) इत्यादी आजारांचे नियमित चाचण्या व तपासण्या करून उचित व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. या बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव विनिता वेद सिंगल, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZABBD
Similar Posts
‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महिलांमध्ये जागृती ठाणे : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार तसेच जनजागृती होण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बचत गटांची उत्पादने मागवा ऑनलाइन मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांत नावारूपाला आलेल्या बचत गटांच्या चळवळीला आता अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी ई-सरस नावाचे मोबाइल ॲप आणि वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात ५० उत्पादने या व्यासपीठावर उपलब्ध करण्यात आली आहेत. राज्यपाल सी
‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन मुंबई : शायना एनसी आणि दाऊदी बोहरा समाजातर्फे मुंबईत १९ जून रोजी ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, रवींद्र भुसारी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, नझम बाग आदी मान्यवर उपस्थित होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language